मुनावर फारुखी याचे समर्थन करणारे माझे समर्थन करत नाहीत ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? मुनावर फारुखी याला एक न्याय आणि तस्लिमा नसरीन यांना दुसरा न्याय असे का ?

सिंधुदुर्ग विमानतळावर आलेल्या ९६ प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोनाबाधित

नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.

शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील समुद्रात प्रकाशझोतात मासेमारी करणारी गोवा येथील यांत्रिक नौका मत्स्य व्यवसाय विभागाने पकडली

वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात, तसेच पर्ससीन नेटचा वापर करून यांत्रिक नौका मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मासेमारांनी दिली होती.

आगामी निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांची युती जिंकणार !  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

“बंगालमध्ये ज्या पद्धतीने योजनाबद्धरित्या निवडणूक जिंकली, त्याप्रमाणे गोव्यासाठीही आमची विशेष योजना आहे. मी सर्व धर्म आणि जाती यांच्यासाठी काम करते” – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सार्वजनिक बांधकाम खात्यात ७० कोटी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाल्याचा सत्ताधारी भाजपच्याच मंत्र्याचा आरोप !

वजन माप खात्यात भरतीच्या वेळी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १०० गुण दिल्याचा आरोप

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली !

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी हे एका कार्यक्रमासाठी जात असतांना करवे या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांच्यावर शाई फेकली.

पोलीस भरती परीक्षा केंद्राच्या नावात त्रुटी असल्याने अनेक परीक्षार्थी त्रस्त !

विद्यार्थ्यांना झालेला त्रास आणि हानी कधीही भरून काढता येणार नसल्याने कामचुकार आयोजक आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला हवी !