उडुपी (कर्नाटक) – भ्रमणभाषवर लाखो रुपये व्यय करण्याऐवजी लोकांनी गायींच्या रक्षणासाठी तलवारी आणि अन्य शस्त्रे खरेदी केली पाहिजेत. जर लोकांना लाखो रुपयांचे भ्रमणभाष विकत घेणे परवडत असेल, तर ते आपल्या गायींच्या रक्षणासाठी नक्कीच शस्त्रे खरेदी करून घरात ठेवू शकतात. शस्त्रांच्या खरेदीमुळे लोक गोहत्या रोखतील, असे विधान विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
साध्वी ने की लोगों से तलवार खरीदने की अपील #VHP https://t.co/uYu5ao7Dy2
— AajTak (@aajtak) December 14, 2021
साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’, हे माझे दोन संकल्प आहेत.