चित्रकूट (उत्तरप्रदेश) – येथे उद्या, १५ डिसेंबर या दिवशी ‘हिंदु एकता महाकुंभ’चे आयोजित करण्यात आले आहे. यात ५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. यात योगऋषी रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर, रामानुजाचार्य चिन्ना जीयर स्वामी, पेजावर मठाचे प्रमुख श्री विश्वप्रसन्न तीर्थ, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित रहाणार आहेत, असे आयोजक तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. २० एकर भूमीवर हा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभच्या माध्यमातून हिंदु धर्मातील सर्व धर्मगुरु आणि पंथ यांना संघटित करण्यात येणार आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, या संपूर्ण कार्यक्रमात कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे.
#HinduEktaMahakumbh : चित्रकूट में ‘हिन्दू एकता महाकुंभ’ का 15 दिसंबर को होगा आयोजन, जानें क्या है उदेश्य
मनोज्ञा लोईवाल @manogyaloiwal की रिपोर्ट #Chitrakoot #UttarPradeshhttps://t.co/L3iwIbT7tn
— ABP News (@ABPNews) December 12, 2021