|
नवी देहली – सध्याचा भारत गांधी यांचा नाही, तर नथुराम गोडसे याचा वाटत आहे. येथे लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्यही नाही, असे विधान जम्मू-काश्मीरमधील ‘पीपल्स डेमोक्रेटिक पक्षा’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी येथील जंतरमंतरवर झालेल्या एका आंदोलनाच्या वेळी बोलतांना केले. (लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य नसते, तर मेहबूबा मुफ्ती असे विधान करू शकल्या असत्या का ? संपादक)
जम्मू-कश्मीर की पूर्व मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती का विवादित बयान..’हर घर कब्र बन चुका है’#Jammukashmir | #PDP | #MehboobaMufti
अन्य Videos यहां देखें – https://t.co/ZoADfwSi4S pic.twitter.com/VU4pzTLibS
— Zee News (@ZeeNews) December 6, 2021
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार भारताच्या जनतेसमोर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे दाखवत आहे; मात्र प्रत्यक्षात येथे रस्त्यावर रक्ताचे पाट वहात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांवर आतंकवादीविरोधी कायदा थोपवले जात आहेत. देशाच्या जनतेसमोर ज्या ‘नया कश्मीर’चा प्रचार केला जात आहे, ते सत्य नाही. काश्मीरची परिस्थिती जो देशाच्या जनतेपुढे मांडू पहातो, त्याला ‘पाकिस्तानी’ म्हटले जाते. (काश्मीरची स्थिती मांडण्याच्या नावाखाली पाकिस्तानी धोरण जर कुणी पुढे रेटत असेल, तसेच भारतविरोधी भूमिका मंडत असेल आणि त्यामुळे जर त्याला कुणी ‘पाकिस्तानी’ म्हणत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ? – संपादक)