उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. शर्वरी विकास सणस ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१६ मध्ये ‘चि. शर्वरी विकास सणस उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५५ टक्के पातळीची’, असे घोषित करण्यात आले होते. आता तिची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया (५.१२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी विकास सणस हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. (‘वर्ष २०१६ मध्ये कु. शर्वरी विकास सणस हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)
कु. शर्वरी विकास सणस हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!
१. समजूतदारपणा
‘कु. शर्वरी पुष्कळ समजूतदार आहे. ती तिच्या लहान बहिणीचीसुद्धा नीट काळजी घेते. ती पाळणाघरातही पुष्कळ छान रहायची. पाळणाघरातल्या बाई म्हणाल्या, ‘‘तिच्या समवेतची मुले तिला त्रास देऊनही ती त्यांना त्रास न देता शांत रहायची.’’
२. साधनेची आवड
२ अ. तिला सांगितल्यावर लगेच ती कापूर लावण्याचा उपाय करते आणि घरात गोमूत्र शिंपडते.
२ आ. नामजप करणे : तिला नामजप करण्याची पुष्कळ आवड आहे. ती प्रवासाला जातांना, शाळेत जातांना आणि शाळेतही मोठ्याने नामजप करत असे. एकदा शाळेत मोठ्याने नामजप करत असतांना वर्गशिक्षिकेने तिला सांगितले, ‘‘नामजप करू नको.’’ तेव्हा तिला वर्गशिक्षिकेचा राग आला. तिने घरी आल्यावर मला सांगितले, ‘‘बाई, मला नामजप करू देत नाहीत.’’ मी तिला समजावून सांगितल्यावर ती हळू आवाजात नामजप करू लागली.
२ इ. सात्त्विक गोष्टी ऐकणे : तिला गायत्री मंत्र आणि ‘ओम नमो नारायणा …’ हे गीत म्हणायला अन् ऐकायला पुष्कळ आवडते. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची देहशुद्धीची ध्वनीफित ऐकल्यावर चांगले वाटते’, असे ती म्हणते. तिला दूरचित्रवाणी न बघता देवाच्या गोष्टी ऐकण्यास आवडतात.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले भेटत नाहीत; म्हणून रडणे : शर्वरीची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. ‘एखादी कृती करण्यास प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे’, असे तिला सांगितल्यावर ती सगळे ऐकते. तिला त्यांना भेटण्याची पुष्कळ तळमळ आहे. एकदा ‘मी नामजप करूनही प.पू. गुरुदेव मला भेटत नाहीत’, असे म्हणून ती पुष्कळ रडत होती. ‘आपण जे करत असतो, ते सगळे प.पू. गुरुदेवांना दिसत असते’, असे ती म्हणते.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टर आजारी पडू नयेत; म्हणून पुष्कळ वेळ नामजप करणे : एकदा मी तिला सांगितले, ‘‘परम पूज्य डॉक्टरआजोबा आजारी आहेत.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘ते देव आहेत. देव कधी आजारी पडतो का ?’’ मग मी तिला समजावले, ‘‘आपण नामजप केला नाही, तर प.पू. गुरुदेवांना त्रास होतो आणि ते आजारी पडतात.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव आजारी पडू नयेत; म्हणून तिने पुष्कळ नामजप केला.
४. स्वभावदोष
इतरांमध्ये न मिसळणे, भिडस्तपणा, राग येणे, मोठ्याने बोलणे’
– सौ. ऋतुजा सणस (शर्वरीची आई), शीव, मुंबई. (११.६.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |