१. रुग्णाईत अवस्थेत यजमानांना ‘ऑनलाईन’ सत्संगाचा आधार वाटणे आणि त्यांच्या निधनानंतर परिस्थिती स्वीकारून स्वतःही ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकण्यास आरंभ करणे
‘माझे यजमान रुग्णाईत असतांना अतीदक्षता विभागात होते. तेथेही ते ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकत होते. त्यांना सत्संगाचा आधार वाटत होता. शेवटी यजमानांचे निधन झाले. तेव्हा ‘हे प्रारब्ध माझे आहे’, असे गुरुकृपेने मला समजले आणि मला ही परिस्थिती स्वीकारता आली. त्यामुळे मीसुद्धा ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकण्यास आरंभ केला.’
– श्रीमती उज्ज्वला नन्ना, पुणे (२४.५.२०२१)
२. ‘ऑनलाईन’ सत्संगात प्रारब्धाविषयी माहिती कळल्यावर साधिकेने नामजप आणि सेवा चालू करणे अन् त्यामुळे गंभीर त्वचारोग उणावून तिला आनंद मिळणे
‘मला त्वचारोगाचा (‘सोरायसीस’चा) फार त्रास होता. मी नेहमी रुग्णाईत असल्याने माझी फार चिडचिड व्हायची. ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे मला ‘हे माझे प्रारब्ध आहे’, हे कळले. त्यामुळे मी नामजप आणि सेवा चालू केली. तेव्हापासून माझा त्रास अल्प झाला. आता मला फार आनंद मिळतो. आता माझ्या मनात सतत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासाठी किती करतात आणि मी त्यांच्यासाठी काय करू ?’, असेच विचार असतात. त्यामुळे ‘आता मला दुसरे काहीच नको’, असे वाटते.’
– सौ. सुवर्णा मारकड, पुणे (२४.५.२०२१)