पंतप्रधान ४ दिवसांच्या विदेश दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ दिवसांच्या विदेश दौर्‍यावर गेले आहेत. २९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ते इटलीची राजधानी रोम येथे पोचले. ते २९ ते ३१ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत इटलीमध्ये असतील.

आर्यन खान याला जामीन संमत; मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ३० ऑक्टोबर या दिवशी सुटका होणार !

आर्यन याच्या सुटकेसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामिनाची कागदपत्रे आर्थर रोड कारागृहाच्या टपाल पेटीत टाकणे आवश्यक होते; मात्र कागदपत्रे वेळेत न आल्याने आर्यन याला आणखी १ दिवस कारागृहात रहावे लागणार आहे.

‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखून सामाजिक माध्यमांवरील भावनिक बाजारापासून सावधान रहा ! – अजित पारसे, सायबर तज्ञ

शहरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०१९ मध्ये १२६ गुन्ह्यांची, तर वर्ष २०२० मध्ये २०० च्या आसपास गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे !’

हिंदूंनी यंदाची दिवाळी ‘हलालमुक्त दिवाळी’ म्हणून साजरी करावी ! 

‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होणार ! हिंदु जनजागृती समिती सामाजिक माध्यमांतून जनजागृती करत आहे.

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.

हिंदूंनी यापुढील काळात दिवाळीसह प्रत्येकच सण ‘हलालमुक्त’ साजरा करावा ! – ओंकार शुक्ल, भाजप

ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना राष्ट्रीय अधिकोष आणि टपाल विभाग हे शासनाचे अधिकृत आस्थापन सुरक्षित वाटते, त्याचप्रमाणे शासनाने अन्न व औषध प्रशासनाला दिलेले प्रमाणीकरण हेच सर्वोच्च आहे. भारत सरकारचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ असतांना स्वतंत्र हलाल प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही.

कुख्यात गुंड छोटा राजन याची ३८ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दाेष मुक्तता !

कुख्यात गुंड छोटा राजन याची एका खटल्यातून ३८ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली आहे. वर्ष १९८३ मध्ये मद्याची तस्करी करणार्‍या छोटा राजन आणि त्याचे सहकारी यांना अडवणार्‍या एका पोलीस अधिकार्‍यावर त्यांनी जीवघेणे आक्रमण केले होते.

भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले स्पर्धा !

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने ‘भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही ‘युनिव्हर्सल पास’ सक्तीचा !

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर दोन लसी घेतलेल्या एकूण २५ लाखांहून अधिक जणांनी मासिक पास घेतला आहे.