नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ दिवसांच्या विदेश दौर्यावर गेले आहेत. २९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ते इटलीची राजधानी रोम येथे पोचले. ते २९ ते ३१ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत इटलीमध्ये असतील. येथे ते ‘जी-२०’ (२० देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या गर्व्हनरांची परिषद) शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. यानंतर पंतप्रधान ग्लासगो (स्कॉटलंड) येथे जातील. तेथे ते वातावरणातील पालटांविषयीच्या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्येही जाऊ शकतात.