कुख्यात गुंड छोटा राजन याची ३८ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दाेष मुक्तता !

गुन्ह्याच्या अन्वेषणात त्रुटी रहाणे, हे पोलिसांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे ! – संपादक 

मुंबई – कुख्यात गुंड छोटा राजन याची एका खटल्यातून ३८ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली आहे. वर्ष १९८३ मध्ये मद्याची तस्करी करणार्‍या छोटा राजन आणि त्याचे सहकारी यांना अडवणार्‍या एका पोलीस अधिकार्‍यावर त्यांनी जीवघेणे आक्रमण केले होते. या प्रकरणात छोटा राजन याची जामिनावर मुक्तता झाली होती. हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते. साक्षीदार आणि पुरावे सापडत नसल्यामुळे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने

हा खटला बंद करण्याची विनंती केली होती; मात्र न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेचा हा अहवाल फेटाळला होता. आता याच खटल्यातून न्यायालयाने छोटा राजन याची निर्दाेष मुक्तता केली आहे.