मुंबई – ‘क्रूझ’वरील कारवाईत अटक करण्यात आलेला अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना २८ ऑक्टोबर या दिवशी प्रत्येकी १ लाख रुपयांचा जामीन संमत झाला आहे. जामीन मिळूनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्यामुळे २९ ऑक्टोबर या दिवशी आर्यन यांसह अन्य आरोपींची सुटका झालेली नाही. ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी आर्थर रोड कारागृहातून आर्यन याची सुटका होण्याची शक्यता आहे.
आर्यन याच्या सुटकेसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामिनाची कागदपत्रे आर्थर रोड कारागृहाच्या टपाल पेटीत टाकणे आवश्यक होते; मात्र कागदपत्रे वेळेत न आल्याने आर्यन याला आणखी १ दिवस कारागृहात रहावे लागणार आहे. अभिनेत्री जुही चावला या आर्यन याच्यासाठी जामीनदार राहिल्या आहेत.