थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांचा विसर पडणे, राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! – नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’ संघटना

गोवा मुक्तीलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिनाचा वास्को येथील राजकारण्यांना विसर पडल्याविषयी आश्चर्य वाटते. राजकारण्यांसाठी ही गोष्ट लज्जास्पद आहे.

दिवसा पथदीप (स्ट्रीट लाईट) चालू राहिल्याने होणारा विजेचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना काढा !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

डॉ. दाभोलकर हत्येच्या खटल्यातील आरोपींकडून दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि लेखक यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी तक्रार

दैनिक ‘लोकसत्ता’च्या ३० सप्टेंबर या दिवशीच्या अंकात ‘दाभोलकर हत्या-खटल्याचे ‘भविष्य’ – आरोपनिश्चिती ‘विशेष न्यायालया’त झाल्यामुळे घडणारा अनर्थ टाळण्यासाठी कृती आताच होईल का ?’ या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला आहे.

वांद्रे (मुंबई) येथून आणखी एका आतंकवाद्याला अटक !

‘आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अटक का होते ?’, याचे उत्तर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणणार्‍यांनी दिले पाहिजे ! घातपात घडवण्यासाठी कार्यरत असणारी आतंकवाद्यांची मोठी यंत्रणा देशासाठी घटक !

आरे वसाहत (मुंबई) येथे घराबाहेर आलेल्या महिलेवर बिबट्याचे आक्रमण !

२९ सप्टेंबरच्या सायंकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली. बिबट्याच्या आक्रमणात निर्मलादेवी खाली पडल्या; मात्र त्यांनी हातातील काठी सोडली नाही. निर्मलादेवी यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे प्राण वाचले.

धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने पुण्यात निदर्शने

बळजोरीने धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या सुटकेसाठी निदर्शने करणारेही तेवढेच दोषी नव्हेत का ? पोलीस अशांवर कारवाई का करत नाहीत ?

नागपूर येथील मुद्रांक विक्रेत्यांकडून १०० रुपये मुद्रांकांची ५०० रुपयांना विक्री करून नागरिकांची लुबाडणूक ! 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मुद्रांक विक्रेते नागरिकांची अशी लुबाडणूक करत असतांना जिल्हा प्रशासन झोपले आहे का ? त्यांना या गोष्टी ठाऊक असतांनाही ते मुद्रांक विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?

गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्रशासन इच्छुक ! – शोभा करंदलाजे, केंद्रीय कृषी राज्यमंत्री

‘‘गोव्याला कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र गोवा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’

१९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

१९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होईल. ‘एफ्.आर्.पी.’चे तुकडे करणार्‍यांच्या विरोधात ‘जागर एफ्.आर्.पी.चा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाचा प्रारंभ जोतिबा डोंगरावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होईल.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्राचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी ३ मासांनी वाढवला !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण…