राज्यातील निवासी आधुनिक वैद्य आजपासून संपावर !

निवासी आधुनिक वैद्यांनी कोरोनाच्या काळात चांगली सेवा देऊनही त्यांच्या मागण्यांची पूर्तता न करणे, हे अयोग्य आहे. जर मागणी पूर्ण करायची नव्हती, तर निवासी आधुनिक वैद्यांना आश्वासन का दिले ? संपामुळे होणार्‍या हानीभरपाईचे दायित्व  कोण घेणार ?

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना १ वर्षाची मुदतवाढ

शासनाने कॅसिनोंना सातत्याने मुदतवाढ देणे नव्हे, तर ते कायमचे बंद करणे अपेक्षित आहे !

सैन्यासाठी सुसज्ज दळणवळण !

भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !

श्रेयवादातून सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे २ वेळा लोकार्पण

राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तालुक्यातील सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे लोकार्पण केले.

संभाजीनगर येथील गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बसचालकाला ३ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड !

या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका ‘व्हॉट्सॲप’वर व्हिडिओ पाठवला होता.

विकृत ‘बिग बॉस’ला हद्दपार करा !

हिंदु राष्ट्रात ज्यातून प्रेक्षकांना चांगले संस्कार होतील, राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होईल, असेच कार्यक्रम दाखवण्यात येतील !

कुडाळ येथे नागरिकांच्या बैठकीत परप्रांतीय व्यापार्‍यांना आळा घालण्याची मागणी

स्थानिक भाजीविक्रेत्याला परप्रांतीय भाजीविक्रेत्याने मारहाण केल्याचे प्रकरण

सामाजिक संकेतस्थळांमुळे बाललैंगिक अत्याचारांमध्ये वृद्धी ! – शीतल जानवे-खराडे, पोलीस उपअधीक्षक

पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी लैंगिक अत्याचारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल ?, योग्य- अयोग्य स्पर्श याविषयी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुणे येथे २ पोलिसांच्या अंगावर रिक्शा घालून त्यांना घायाळ करत चोराचे पलायन !

गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?