आरे वसाहत (मुंबई) येथे घराबाहेर आलेल्या महिलेवर बिबट्याचे आक्रमण !

महिलेवर बिबट्याचे आक्रमण

मुंबई – आरे वसाहतीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर आक्रमण केले. महिलेने हातातील काठीने केलेल्या प्रतिकारामुळे  बिबट्या पळून गेला. निर्मलादेवी सिंह (वय ५५ वर्षे) असे महिलेचे नाव आहे.

२९ सप्टेंबरच्या सायंकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली. बिबट्याच्या आक्रमणात निर्मलादेवी खाली पडल्या; मात्र त्यांनी हातातील काठी सोडली नाही. निर्मलादेवी यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे प्राण वाचले