वांद्रे (मुंबई) येथून आणखी एका आतंकवाद्याला अटक !

देशात घातपाती कारवायांचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

‘आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अटक का होते ?’, याचे उत्तर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणणार्‍यांनी दिले पाहिजे ! – संपादक 

घातपात घडवण्यासाठी कार्यरत असणारी आतंकवाद्यांची मोठी यंत्रणा देशासाठी घटक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – देशात घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आतंकवाद्यांपैकी आणखी एका आतंकवाद्याला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने २९ सप्टेंबरच्या रात्री वांद्रे येथून अटक केली. महंमद इरफान रहमत अली शेख असे त्याचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी देहली पोलिसांनी देशातील वेगवेगळ्या भागांतून ६ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांतील जान महंमद शेख या आतंकवाद्याला धारावी (मुंबई) येथून अटक करण्यात आली होती. देहली पोलिसांच्या या कारवाईनंतर महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने १८ सप्टेंबर या दिवशी जोगेश्वरी येथून झाकीर, तर १९ सप्टेंबरला झाकीर शेख आणि रिझवान यांना अटक केली होती. देहली पोलिसांनी अटक केलेल्या आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये हे दोघे सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या सांगण्यावरून कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याकडून या आतंकवादी कारवाया चालू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. झाकीर शेख आणि रिझवान या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते; मात्र आतंकवादविरोधी पथकाने त्यांना पुन्हा कह्यात घेतले आहे. या दोघांच्या घरातून मिळालेले पुरावे आणि संपर्क यांवरून आणखी काही जण या कारवायांमध्ये सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.