धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने पुण्यात निदर्शने

आंदोलनात पुण्यातील २२ संघटनांचा सहभाग

बळजोरीने धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या सुटकेसाठी निदर्शने करणारेही तेवढेच दोषी नव्हेत का ? पोलीस अशांवर कारवाई का करत नाहीत ? – संपादक 

मौलाना कलीम सिद्दीकी

पुणे – धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने ३० सप्टेंबर या दिवशी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात पुण्यातील २२ संघटना सहभागी झाल्या होत्या.

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ‘ग्लोबल पीस सेंटर’चा अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. या प्रकरणात मुफ्ती जहांगीर आणि मौलाना उमर गौतम या दोघांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे दोघेही कलीम सिद्दीकी याच्याशी संबंधित आहेत. कलीम सिद्दीकी याच्या खात्यात विदेशातून कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. हवालाच्या माध्यमातून जमा झालेल्या या पैशांचा वापर सिद्दीकी याच्याकडून धर्मांतरासाठी केला जात असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या वेळी पुढील राष्ट्रघातकी मागण्या करण्यात आल्या

१. मौलाना कलीम सिद्दीकी, मुफ्ती जहांगीर आणि मौलाना उमर गौतम यांची सुटका करावी.

२. त्यांच्या विरोधात असलेले गुन्हे रहित करावेत.

३. या कारवाईत असलेल्या सरकारी अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी.