राज्यघटना ‘सेक्युलर’ (निधर्मी) असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘गणेशोत्सवामध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करण्याचा संकल्प’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र घेण्यात आले.

‘भारताचे खातो आणि पाकिस्तानचे गुणगान गातो !’ – समाजमाध्यमांतून शहारूख खान यांच्यावर टीकेची झोड

तालिबानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याच्या प्रकरणी चित्रपट अभिनेते शहारूख खान यांच्यावर समाजमाध्यमांतून ‘भारताचे खातो आणि पाकिस्तानचे गुणगान गातो’, अशा शब्दांत टीकेची झोड उठत आहे.

आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी गुन्हा रहित होणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

जफर अली याने प्रसारित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘पोस्ट’चे प्रकरण ! साम्यवादी, पुरोगामी, चित्रपट व्यावसायिक आदी समाजमाध्यमांवर सातत्याने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे संदेश प्रसारित करत असतात. हिंदू त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करू शकतात ! – संपादक  मुंबई – समाज माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे … Read more

(म्हणे) ‘अनेक लोकांनी माझ्या मताशी सहमती दर्शवली आहे !’ – जावेद अख्तर, गीतकार

नसानसांत हिंदुद्वेष भिनलेल्या जावेद अख्तर यांना समर्थन देणारे त्यांच्याच मानसिकतेचे आहेत, हे सांगायला वेगळ्या आरशाची आवश्यकता नाही !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागाची धाड

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे २५ हून अधिक अधिकारी त्यांच्या घरी आले; त्यांपैकी काही अधिकारी हे त्यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्या वेळी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

पेठ वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांची हत्या केल्याच्या प्रकरणी ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांना निवेदन देण्याची वेळ का येते ? बेपारी गल्ली येथे गोहत्या होत आहे हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?, कि पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

औषधी वनस्पतींच्या लागवडीचे आमीष दाखवत ५०० हून अधिक शेतकर्‍यांची २३ कोटी रुपयांची फसवणूक !

शेतात औषधी वनस्पतींची रोपे, लागवड, खत पुरवठा, देखरेख या सुविधांसह १ वर्षाने पीक जागेवर विकत घेण्याचे आमीष शेतकर्‍यांना दाखवण्यात आले होते. पाटणकर यांनी शेतकर्‍यांना एकरी ५० सहस्र रुपये आस्थापनामध्ये गुंतवण्यास भाग पाडले होते.

शिरसोली (जळगाव) येथे गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला !

हिंदूंंच्‍या धर्मभावनांशी खेळणार्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित व्‍यक्‍तींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी कचर्‍याचा ट्रॅक्‍टर देण्‍यास  प्रशासन धजावते तरी कसे ?

कमरेला देण्‍याचे ‘इंजेक्‍शन’ हाताला दिल्‍याने हात लुळा पडला !

पिंपळकर यांच्‍यासारख्‍या सामान्‍य माणसावर अन्‍याय झाला, तर त्‍याला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी आरोग्‍य केंद्राचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी स्‍वतःहून पुढाकार घेऊन साहाय्‍य करायला हवे !

पुणे येथील शेख कुटुंबात गेल्या २० वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन !

मुसलमानांना हिंदूंच्या देवतांचे महत्त्व लक्षात येते; मात्र हिंदूंनाच हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात न येणे दुर्दैवी आहे. कुठे मजारीवर माथा टेकवणे, तर कुठे अफझलखानाच्या थडग्याच्या ठिकाणी नवस बोलणे अशा कृती हिंदू करतात.