व्यावसायिकाकडे ५ लाखांची खंडणी मागणार्या पत्रकारास अटक !
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगत व्यावसायिकाकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्रकार अर्जुन शिरसाट यांना १६ सप्टेंबरच्या रात्री अटक केली.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगत व्यावसायिकाकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्रकार अर्जुन शिरसाट यांना १६ सप्टेंबरच्या रात्री अटक केली.
जावळी तालुक्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर बळजोरी करत तिचे लैंगिक शोषण केले. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयितास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे(गुरुजी) यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथे अनुमाने १ घंटा बंद खोलीत चर्चा झाली; मात्र त्यातील तपशील समजू शकला नाही.
उड्डाणपूल पूर्ण बांधून झाल्यावर किंवा आता गर्दीच्या वेळी कोसळला असता, तर किती जीवितहानी झाली असती, याची कल्पनाच करता येणार नाही ! काही वर्षांपूर्वी घाटकोपर येथे मेट्रोसाठी बांधण्यात येणारा पूलही कोसळला होता.
या वेळी त्यांनी ‘वेदभवन’ येथील अभ्यागत कक्षाचीही पहाणी केली. वेदपाठशाळेचे प्रमुख वेदाचार्य घैसासगुरुजी यांनी राज्यपालांना पाठशाळेविषयी माहिती दिली. या वेळी विश्वस्त मुकुंदराव चितळे, दत्तात्रेय सप्रे यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने १७ सप्टेंबर या दिवशी खासदार श्री. माने यांची भेट घेतली.
मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले जाणार असून लवकरात लवकर ते मोठे विद्यापीठ व्हावे…
शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपये मागितले होते, असा खुलासा सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) केला आहे, असे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पुढे भाजप-शिवसेना युती होण्याविषयी राजकीय तर्क-वितर्क चालू झाले आहेत. असे असतांना दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देऊन विषयाला वेगळे वळण दिले आहे.
पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य !