पेठ वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांची हत्या केल्याच्या प्रकरणी ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांना निवेदन देण्याची वेळ का येते ? बेपारी गल्ली येथे गोहत्या होत आहे हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?, कि पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पेठ वडगाव (जिल्हा कोल्हापूर), १७ सप्टेंबर – येथील बेपारी गल्लीमध्ये गोवंशियांची हत्या केल्याच्या प्रकरणी वडगाव पोलिसांनी ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद केला असून अनुमाने ३ लाख रुपयांचे मांस भरलेला टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपारी गल्लीतील सद्दाम बेपारी, शफीक बेपारी, हुसेन बेपारी, मुन्ना बेपारी यांनी अनुमतीविना गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस विक्रीसाठी ठेवले होते, तसेच काही गोवंशियांची हत्या करण्यासाठी खोलीत डांबून ठेऊन त्यांना क्रूर वागणूक दिली जात होती. पोलीस अशोक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बेपारी गल्लीमध्ये गोहत्या केली जात आहे, अशी तक्रार शहरातील बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, युवा सेना, शिवसेना, मनसे, भाजप या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनात १२ जणांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. निवेदनावर धनंजय गोंदकर, अंकुश माने, सुनील माने, किरण कोळी, किरण पुरोहित, अनिल माने, वैभव हिरवे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.