‘भारताचे खातो आणि पाकिस्तानचे गुणगान गातो !’ – समाजमाध्यमांतून शहारूख खान यांच्यावर टीकेची झोड

तालिबानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याचा परिणाम

राष्ट्रप्रेमींनो, पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या अभिनेत्यांना क्षमा मागायला भाग पाडा ! – संपादक

अभिनेते शहारूख खान व अभिनेते नसरुद्दीन शहा

मुंबई – तालिबानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याच्या प्रकरणी चित्रपट अभिनेते शहारूख खान यांच्यावर समाजमाध्यमांतून ‘भारताचे खातो आणि पाकिस्तानचे गुणगान गातो’, अशा शब्दांत टीकेची झोड उठत आहे. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शाहरूख यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे.

‘यापूर्वी शाहरूख खान यांनी अनेकदा स्वतःच्या चित्रपटांतून पाकिस्तानचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता’, याचा संदर्भ देत काहींनी खान यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यांसह आतापर्यंत त्यांनी केलेल्या विविध देशविरोधी वक्तव्यांवरही समाजमाध्यमांतून टीका केली जात आहे. ‘चित्रपट क्षेत्राने धार्मिक भावना दुखावणे आणि त्या भडकावणे आता बंद करावे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही समाजमाध्यमांत व्यक्त होत आहेत.

जेव्हा भारतातील धार्मिक गोष्टी त्यांतील भेदभाव यांविषयी व्यक्त होण्याची वेळ येते; तेव्हा खान मंडळी मागे सरकतात ! – अभिनेते नसरुद्दीन शहा

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अभिनेते नसरुद्दीन शहा म्हणाले, ‘‘जेव्हा भारत आणि विदेश यांमधील धार्मिक गोष्टी, त्यांतील भेदभाव यांविषयी व्यक्त होण्याची वेळ येते; तेव्हा खान मंडळी मागे सरकतात. भारतातील ‘मुस्लिम’ हा पूर्णपणे वेगळा आहे; मात्र काही भारतीय ‘मुस्लिम’ हे तालिबान्यांचे समर्थन करतांना दिसत आहेत.’’

खान समर्थकांचा हिंदुत्वनिष्ठ सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात ‘ट्विटर ट्रेंड !’

हिंदुत्वनिष्ठ आणि सुदर्शन वाहिनीचे मालक सुरेश चव्हाणके यांनी ‘शहारूख खान यांच्या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर खान समर्थकांनी ‘सुरेश चव्हाणके देशद्रोही’ असा ‘ट्विटर ट्रेंड’ चालवला.