गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाप्रमुख ओंकार शुक्ल यांना ९ ते २० सप्टेंबर या कालावधीत सांगली महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदीची नोटीस !

या संदर्भात श्री. ओंकार शुक्ल म्हणाले, ‘‘मला आलेली नोटीस पूर्णत: चुकीची असून ही कारवाई पोलीस प्रशासनाकडून सूडबुद्धीने करण्यात आली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो.

‘मोदी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीने मुंबईहून गणेशभक्त कोकणात दाखल !

या गाडीतील प्रवाशांना विनामूल्य प्रवासासह एकवेळचे जेवण आणि पाणीही विनामूल्य देण्यात आले होते.

शासनाला स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नाही ! – गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा सापडला कंत्राटदाराच्या गोदामात !

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

शिरूर (जिल्हा पुणे) येथील अतिक्रमण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

अवैध अतिक्रमणांविरुद्ध तक्रारी देऊनही कारवाई होत नसेल, तर जनतेने कुणाकडे पहावे ? गेल्या ७ दशकांतील काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाचेच हे फलित आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार !

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोघांनी स्वतंत्रपणे विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार असल्याचे घोषित केले आहे.

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींची होणारी विटंबना रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनेद्वारे मागणी

राज्य सरकार शिक्षकांचा अनादर करत आहे ! – शिक्षकांचा राज्य सरकारवर आरोप

ज्ञानदानासाठी आयुष्य व्यय केले, त्या शिक्षकांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवणार्‍या सरकारचा शिक्षकांनी निषेध केला. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ५ जणांचा मृत्यू !

अकोला तालुक्यातील आगर येथील मनोज खाडे यांचा तलावात बुडून, तर कानशिवणी येथील सागर कावरे आणि गोपाल कांबे हे बैलाला अंघोळ घालत असतांना नदीच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मिरज येथून सातारा येथे प्रतिनियुक्तीवर गेलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना सातारा येथून तात्काळ कार्यमुक्त करावे !

आमदार सुधीर गाडगीळ यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन