आमदार सुधीर गाडगीळ यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन

सांगली, ८ सप्टेंबर – मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले रुग्णालय ही पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. महाराष्ट्र शासनाने या महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि साहाय्यक प्राध्यापक यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स या संस्थेमधून गेल्यामुळे या ठिकाणी येणारे रुग्ण आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. तरी याची नोंद घेऊन मिरज येथून सातारा येथे प्रतिनियुक्तीवर गेलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि साहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सातारा येथून तात्काळ कार्यमुक्त करून त्यांना पूर्ववत् मिरज येथे कामावर उपस्थित होण्यासाठी आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिले.
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !