मेढा (जिल्हा सातारा) येथे ६ चंदनचोरांना अटक

जावळी तालुक्यातील बामणोली भागातील आपटी गावच्या सीमेमध्ये चंदनाच्या झाडांची अवैध तोडणी करण्यासाठी एक टोळी आली होती; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मेढा पोलिसांनी ६ चंदनचोरांना अटक केली आहे.

सावंतवाडीतील मोती तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आणलेल्या नौकांचा शुभारंभ

सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येथील मोती तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, यासाठी ४ नवीन नौका आणल्या आहेत. या नौकांचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते ७ सप्टेंबर या दिवशी करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३७४ झाली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ३४७ झाली आहे.

…अन्यथा सातारा नगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करू ! – शिवसेना

शहरामध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढत आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या चिंताजनक असून पालिकेतील यंत्रणा सुस्तावलेली आहे. ही यंत्रणा कामाला लावा, अन्यथा पालिकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

पर्यावरणपूरक स्पर्धेतून दिशाभूल !

प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.

२० वर्षांनंतर ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण

खारेपाटण येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी ‘खारेपाटण रोड रेल्वेस्थानक संघर्ष समिती’ने गेली अनेक वर्षे विविध आंदोलने केली होती. या स्थानकाचा आजूबाजूच्या ५० ते ६० गावांना लाभ होणार आहे.

कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतीवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.

पुणे येथे स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सहकारनगर नागरिक मंच’ची स्थापना !

शहरातील विकास नागरिकांच्या करातून केला जातो; मात्र हा विकास नागरिकांच्या हितासाठी आणि योग्य व्यय करून केला जातो का ?, हे लक्षात यावे यासाठी आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवणे यांसाठी ‘सहकारनगर नागरिक मंच’ची स्थापना केली.

देवाचा पैसा धर्मासाठीच खर्च व्हावा !

मंदिराच्या भूमीचा आणि संपत्तीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच ‘मालक’ म्हणून संबोधली जायला हवी. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करतो, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे.

धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्यासह हवाला आणि काळा पैसा यांवर प्रतिबंध आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

हिंदु धर्मातील जगद्गुरूंनीही काळानुसार ‘धर्मांतरविरोधी कायद्या’ची मागणी करणे आवश्यक आहे.