२० वर्षांनंतर ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण

स्थानकात आलेल्या पहिल्या गाडीचे जल्लोषात स्वागत

खारेपाटण रेल्वेस्थानक

कणकवली – कोकण रेल्वेमार्गावर चिंचवली (खारेपाटण) येथे रेल्वेस्थानक व्हावे, अशी गेल्या २० वर्षांपासूनची मागणी अखेर ७ सप्टेंबरला पूर्णत्वास गेली. येथे बांधण्यात आलेल्या ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकात ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी आलेल्या पहिल्या सावंतवाडी-दिवा रेल्वेगाडीचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि प्रवासी यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या वेळी गाडीचे मोटरमन, स्टेशन मास्तर आणि येथे आरक्षण करून प्रवास करणारे पहिले प्रवासी भंडारवाडी, चिंचवली येथील निकष वैजनाथ मगर यांचेही स्वागत करण्यात आले.

खारेपाटण येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी ‘खारेपाटण रोड रेल्वेस्थानक संघर्ष समिती’ने गेली अनेक वर्षे विविध आंदोलने केली होती. या स्थानकाचा आजूबाजूच्या ५० ते ६० गावांना लाभ होणार आहे.