
सावंतवाडी – सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येथील मोती तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, यासाठी ४ नवीन नौका आणल्या आहेत. या नौकांचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते ७ सप्टेंबर या दिवशी करण्यात आला. या नौकांमुळे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
या वेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक यांच्यासह दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, आनारोजीन लोबो, भारती मोरे आणि शुभांगी सुकी या नगरसेविकाही उपस्थित होत्या.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !