पुणे येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस !

१४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्थानकावरून घरी सोडण्याचे खोटे आमीष दाखवून तिला शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि खडकी परिसरातील ‘लॉज’वर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लातूरमध्ये दोन पाझर तलाव फुटले !

जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला. जोरदार पावसामुळे या भागातील सर्वच नदी नाले आणि ओढे यांमध्ये पाणी वाढले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना पथकर माफ ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणार्‍यांना मुंबई, गोवा, पुणे या महामार्गांवरील पथकर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावेत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

चांदा (नगर) येथील अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनेकदा कारवाई होऊनही या भागात अवैध पशूवधगृहे चालूच आहेत. निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच धर्मांधांना कायद्याचा धाक राहिलेला नाही ! आरोपींना कठोर शासन होत नसल्यामुळेच अवैध पशूवधगृहे बंद पडत नाहीत !

विश्व हिंदु परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची तुलना जावेद अख्तर यांनी तालिबान्यांशी केली होती. त्यामुळे विश्व हिंदू परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

जालना, बीड, नांदेड, परभणी येथे अतीवृष्टीसदृश पाऊस !

पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या धरणाच्या १६ दरवाजांतील ११ दरवाजे दोन मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले.

श्री गणेशमूर्तींच्या भावात २० ते २५ टक्के वाढ होऊनही पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच मूर्तींना पुणेकरांची पसंती !

पर्यावरणपूरक शाडू, तसेच लाल मातीच्या मूर्तींची अनुमाने ६० टक्के नोंदणी झाल्याचे काही स्टॉलधारकांकडून सांगण्यात येत आहे.

धर्म आणि शास्त्र !

हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.

खारेपाटण तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय

(सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो भाविक विविध मार्गांनी येत असतात. हे प्रशासनाला ठाऊक असूनही तपासणी नाक्यावर आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसणे यातून प्रशासनाची नियोजनशून्यता लक्षात येते !