प्रशासन अकार्यक्षम असल्यानेच अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येते, हे लक्षात घ्या ! – संपादक
सातारा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – शहरामध्ये आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यास नगरपालिकेच्या उपाययोजना अल्प आहेत. शहरामध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढत आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या चिंताजनक असून पालिकेतील यंत्रणा सुस्तावलेली आहे. ही यंत्रणा कामाला लावा, अन्यथा पालिकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सातारा शहरामध्ये कोरोना रोखण्यासाठी जशा उपाययोजना केल्या गेल्या, त्याप्रमाणे डेंग्यू रोखण्यासाठी केलेल्या नाहीत. शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असून एकही नगरसेवक याविषयी चकार शब्द काढण्यास सिद्ध नाही. लोकप्रतिनिधींनी प्रभाग स्वच्छता मनावर घेतल्यास इतर संसर्गजन्य आजारही अल्प होतील; मात्र तसे होत नाही.