कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

देवघर धरण

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतीवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. अतीवृष्टी होऊन धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन, उपकार्यकारी अभियंता, मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागीय कार्यालय, आंबडपाल-कुडाळ यांनी केले आहे.