(म्हणे) ‘मला अपेक्षा आहे की, तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगले शासन करील !’ – फारूक अब्दुल्ला

  • यातून फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! प्रत्येक धर्मांधाला त्याच्या धर्मानुसार म्हणजे शरीयतनुसारच जगात राज्य व्यवस्था हवी आहे; जेथे ती शक्य नाही, तेथे ते तसे करण्याच्या प्रयत्नात असतात, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?
  • तालिबानचा इतिहास आणि वर्तमान क्रौर्याचा असतांना फारूक अब्दुल्ला असे विधान कसे करू धजावतात ?
  • जर ‘तालिबानी हे इस्लामी नियमांनुसार चांगले शासन करू शकतील’, तर ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार हिंदू देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून चांगले शासन करतील. हिंदू हे रामराज्यासारखा कारभार करण्याचा प्रयत्न करतील’, हे फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्या धर्मांधांना का स्वीकारले जात नाही ? ते हिंदु राष्ट्राचा का विरोध करतात ? तालिबान्यांप्रमाणे हिंदू कधीही अत्याचार करणार नाहीत, हा त्यांचा इतिहास सांगतो. हिंदूंवर अखिल मानवजातीचे हित साधण्याचाच संस्कार आहे, हे अब्दुल्ला नाकारू शकतात का ?
नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्य नेते फारूक अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – मला अपेक्षा आहे की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगल्या पद्धतीने शासन करील आणि त्यांच्याकडून मानवाधिकारांचा सन्मान राखला जाईल. त्यांनी सर्व देशांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्य नेते फारूक अब्दुल्ला यांनी तालिबानने सरकार स्थापन केल्याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

तालिबानीप्रेमींना मुसलमान अल्पसंख्यांक आहेत, तेथे सर्वधर्मसमभाव हवा, तर जेथे बहुसंख्य आहेत, तेथे इस्लामी कायदे हवे आहेत ! – भाजप

भाजपचे नेते निर्मल सिंह

भाजपने अब्दुल्ला यांच्या या मतावर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते निर्मल सिंह यांनी म्हटले की, तालिबानकडून महिला आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचार केले जात असतांनाच अब्दुल्ला मात्र तालिबानची बाजू घेतांना दिसत आहेत. ज्या देशांमध्ये मुसलमान अल्पसंख्यांक आहेत, त्या देशात अब्दुल्ला यांना सर्वधर्मसमभाव हवा आहे आणि जिथे मुसलमान बहुसंख्यांक आहेत, तिथे त्यांना इस्लामी कायदे हवे आहेत.