संगीत, नृत्य, लोकशाही, महिला अधिकार आदींचा विरोध करणारा इस्लाम धर्म ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन

  • भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, इस्लामप्रेमी, अभ्यासक आदी याविषयी बोलतील का ? तालिबानचा विरोध करतील का ? – संपादक
  • ‘शरीयत कायद्यानुसार संगीत, नृत्य, नाटक आदींचा विरोध करणारे २१ व्या शतकात रहाण्याच्या लायकीचे आहेत का ?’ असे विज्ञानवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले तालिबानला का विचारत नाहीत ? – संपादक
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – तालिबानने वाद्ये नष्ट केली; कारण इस्लाम संगीताच्या विरोधात आहे. काय धर्म आहे ! संगीत, नृत्य, चित्रपट, नाटक याला इस्लाम विरोध करतो. इस्लाम लोकशाही, महिला अधिकार, स्वतंत्र विचार यांनाही विरोध करतो, अशा शब्दांत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी तालिबानच्या शरीयत कायद्यानुसार चालणार्‍या कारभारावर ट्वीट करत टीका केली आहे.