प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत ! – मध्यप्रदेशातील मंत्री उषा ठाकुर यांचे आवाहन

  • समाजात खून, बलात्कार आदींचे प्रमाण वाढत असतांना ते रोखण्यास सरकारी यंत्रणा हतबल झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन आता समाजानेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे ! – संपादक
  • बहुतेक धर्मांधांकडे परवाना नसलेली शस्त्रे असतात आणि ते हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाहेर काढतात, याचा बंदोबस्त करण्यासाठीही सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेही हिंदूंना वाटते ! – संपादक
मध्यप्रदेश राज्याच्या मंत्री उषा ठाकुर

भोपाळ (मध्य प्रदेश) – सद्य:स्थितीतील वाढते धोके पहाता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे आणि अस्त्रे ठेवली पाहिजेत, असे विधान मध्यप्रदेश राज्याच्या मंत्री उषा ठाकुर यांनी केले आहे. त्या येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. ‘मुलांना संस्कार देण्यासाठी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य देण्यासाठी आध्यात्मिक शिक्षण अन् नियमित पूजा-हवन केलेच पाहिजे’, असा सल्लाही त्यांनी दिला.

उषा ठाकुर पुढे म्हणाल्या की, भगवा रंग हा शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे जर संपूर्ण जग भगवे झाले, तर सगळीकडे आनंदाचे आणि शांततेचे वातावरण असेल.