|
|
कोलकाता (बंगाल) – उत्तर २४ परगणा मतदारसंघातील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर बाँब फेकण्यात आल्याची घटना ७ सप्टेंबरच्या रात्री घडली. या वेळी सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतांना ही घटना घडली. घरावर बाँब फेकण्यात आले, तेव्हा अर्जुन सिंह बाहेर गेले होते; मात्र त्यांचे कुटुंबीय निवासस्थानी होते. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली. यावरून बाँब फेकणार्यांचा शोध घेतला जात आहे.
West Bengal | Bombs hurled at BJP MP Arjun Singh’s house, governor condemns incident
According to reports, the parliamentarian was in Delhi at the time of the incident. So far, there has been no report of any injury. pic.twitter.com/vTiLF9wDUp
— Hindustan Times (@htTweets) September 8, 2021
राज्यपाल जगदीन धनखड म्हणाले की, बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर बाँब फेकण्यात आले. हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. मला आशा आहे की, या प्रकरणी बंगाल पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल. सिंह यांच्या सुरक्षेविषयी यापूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. (जर सातत्याने अशा घटना राज्यात घडत असतील आणि सरकार ते थांबवण्यात अपयशी ठरत असेल, तर तेथे राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? – संपादक)