महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये ‘उर्दू घरे’ उभारण्याचा सरकारचा निर्णय !

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सबलीकरणावर भर देण्यापेक्षा उर्दूचे इतके उदात्तीकरण कशासाठी ?

…अखेर काश्मीर येथील लालचौकातील घंटाघर तिरंगा रंगात न्हाऊन निघाले !

५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली.

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून १ ते १४ ऑगस्ट कालावधीत ‘ऑनलाईन स्वातंत्र्यगाथा शौर्यजागृती व्याख्यान’ शौर्य आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले !

सरकारी घर न सोडणार्‍या अधिकार्‍यांकडून भाड्यासह दंड वसूल करण्यात येणार !

सेवानिवृत्त किंवा स्थानांतर होऊनही मुंबईतील सरकारी निवासस्थाने न सोडणार्‍या अधिकार्‍यांकडून निवासस्थानाच्या भाड्यासह दंड वसूल करण्याचा आदेश शासनाने काढला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांना ईडीकडूनच्या चौकशीची धमकी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे ‘तुमची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करायला लावू’, अशी धमकी दिली.

बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासासमवेत वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरुष ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

बाबासाहेबांना मी भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वर्णन केले.

तालिबानी संकट !

अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल.

तोतया पोलीस निरीक्षकास पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक !

मुंबईत पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून रेल्वे स्थानक परिसरातील वसतीगृहामध्ये रहाणारा सराईत गुन्हेगार पवन उपाख्य मिलिंद सावंत याला गुन्हे शाखेने अटक केली.

नगर येथील पोलीस अधिकार्‍यानेच दिली वाळू तस्करांना कारवाईची बातमी !

पोलीस निरीक्षकानेच आपण कारवाईसाठी येत असल्याची माहिती वाळू चोरांना दिली. हे संभाषण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे आणि एका वाळू चोरामध्ये झाले आहे, असा दावा केला जात आहे.