असे पोलीस हे पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशा पोलिसांचे स्थानांतर करून न थांबता त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे, असेच जनतेला वाटते !- संपादक

नगर, १४ ऑगस्ट – येथील नेवासा तालुक्यात पोलीस निरीक्षकानेच आपण कारवाईसाठी येत असल्याची माहिती वाळू चोरांना दिली. हे संभाषण नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे आणि एका वाळू चोरामध्ये झाले आहे, असा दावा केला जात आहे. त्यांच्यातील संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर याची नोंद घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी करे यांचे तडकाफडकी नगरला नियंत्रण कक्षात स्थानांतर केले आहे. त्यांच्या जागी नेवासा येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.
मात्र ही क्लिप बनावट असल्याचा दावा पोलीस निरीक्षकाने केला आहे, तर पाटील यांनी या प्रकाराच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. याचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.
देशातील मंदिरांसाठी एका स्वतंत्र ‘सनातन संरक्षण बोर्ड’ किंवा समिती यांची स्थापना केली जावी ! – Shankaracharya Sadanand Saraswati
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक