साधनेची तीव्र तळमळ असल्याने केवळ १० मासांत ‘वाचक ते कृतीशील धर्मप्रेमी’ हा साधनेचा प्रवास करणार्‍या पुणे येथील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे !

पुणे येथील ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न अन् त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

कोची येथील कु. मेघना सिजू यांनी भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना जाणवलेले पालट

‘मला भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्यावर मी प्रत्येक कृती करतांना स्वतःला विचारू लागले, ‘मी ही कृती भावपूर्ण करत आहे का ?’ माझ्या अहंमुळे आरंभी मला हे जड जात होते.

प्रेमळ आणि इतरांसाठी त्यागमय जीवन जगणार्‍या जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

४.६.२०२० या दिवशी जळगाव येथील सौ. शोभा अनिल हेम्बाडे (वय ५१ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. (वर्ष २०२१ मध्ये सौ. शोभा हेम्बाडे यांची पातळी ६३ टक्के आहे. – संकलक)

तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७० वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. काकू सतत ‘दुसर्‍याला काय आवडेल ? कशा प्रकारे कृती केली असता दुसर्‍यांना त्रास होणार नाही’, हा विचार करून कृती करतात.

‘कोरोना’मुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर नामजपावर विश्वास नसतांनाही भावाने नामजप आणि प्रार्थना करणे अन् पुढे त्याने नामजपात सातत्य राखणे

माझा भाऊ मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्याने यापूर्वी कधीही नामजप केला नव्हता. इतरांनाही तो नामजप करण्यापासून परावृत्त करायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे कुटुंबातील सर्वांना त्याची काळजी वाटायची.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ‘तेथील देवतांच्या चित्राच्या डाव्या बाजूला श्री गुरुनानक देव आशीर्वादाच्या मुद्रेत बसले आहेत’, असे दिसून ते ‘गुरुतत्त्व एकच असते’, हा संदेश देत आहेत’, असे जाणवणे

‘काही वर्षांपूर्वी मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ‘तेथील देवतांच्या चित्रांच्या डाव्या बाजूला श्री गुरुनानक देव आशीर्वादाच्या मुद्रेत बसले आहेत’, असे मला दिसले.

साक्षात् जगन्नाथाने पसरले हात ।

१.५.२०२० या दिवशी ध्यानमंदिराची स्वच्छता असल्याने तेथील सर्व देवतांच्या मूर्ती आणि चित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कक्षात ठेवण्यात आली होती. तेथेच आम्ही सेवेसाठी बसलो होतो आणि आमच्या समोरच जगन्नाथाची मूर्ती होती.

सद्गुरु जाधवकाका आहेत गुरुदेवांची छबी ।

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी वाहिलेली भावपुष्पांजली पुढे दिली आहे.

पुण्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील आंदर मावळ खोर्‍यात कल्हाट येथील तासुबाई मंदिरावर दरड कोसळली. मंदिराचा बहुतांश भाग दरडीखाली गेला आहे.

लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याची केसरीवाड्यात स्थापना

केसरीवाड्यात लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती यांचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.