सद्गुरु जाधवकाका आहेत गुरुदेवांची छबी ।

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी वाहिलेली भावपुष्पांजली पुढे दिली आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु काका (टीप) आहेत
प्रीतीचा झरा ।
प्रत्येकास वाटे, ते आहेत आपले पिता ।
बोलल्यावर त्यांच्याशी सगळे होते विसरायला ।
गुरुचरणांविना दुसरे काही नकोच आता आपल्याला ।। १ ।।

साधकांची प्रगती व्हावी, असे त्यांच्या मनी ध्यास ।
कृतीतून त्यांच्या तो दिसून येई आपणास ।
सद्गुरु काका आहेत गुरुदेवांची छबी ।
अखंड साधना त्यांच्यातील प्रीतीरूप वाढवी ।। २ ।।

चैतन्यमय आहे त्यांची वाणी ।
आठवण आली त्यांची की, शब्द ऐकू येती कानी ।
गुरुरूप सामावले आहे त्यांच्या रूपात ।
मन भरून येते कृतज्ञताभावात ।। ३ ।।

टीप – सद्गुरु नंदकुमार जाधव

– सौ. कल्पना देशपांडे, संभाजीनगर (१८.६.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक