कोची येथील कु. मेघना सिजू यांनी भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना जाणवलेले पालट

१. भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न

‘मला भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्यावर मी प्रत्येक कृती करतांना स्वतःला विचारू लागले, ‘मी ही कृती भावपूर्ण करत आहे का ?’ माझ्या अहंमुळे आरंभी मला हे जड जात होते. पुष्कळ वेळा मी कृतीशी भाव जोडायला विसरत होते; परंतु लक्षात आल्यावर माझ्याकडून त्यासाठी प्रयत्न होऊ लागले.

कु. मेघना सिजू

१ अ. स्नान करतांना : ‘त्रासदायक आवरण निघून जात आहे आणि मन शुद्ध होत आहे’, असा मी भाव ठेवल्यावर ‘माझ्यावरील आवरण खरोखरंच न्यून होत आहे’, असे मला जाणवत होते.

१ आ. महाप्रसाद ग्रहण करतांना : ‘हा परात्पर गुरुदेवांचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवल्यावर ‘अन्न ग्रहण करतांना आनंद आणि समाधान मिळत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

१ इ. सेवा शिकतांना : मी मल्याळम् भाषेत टंकलेखन करण्याची सेवा शिकत आहे. भाव ठेवून प्रयत्न केल्यावर मी त्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करू लागले.

२. प्रयत्न करू लागल्यावर जाणवलेले पालट

अ. मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन थकवा न्यून झाला.

आ. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या, तरी उत्साह जाणवू लागला.’

– कु. मेघना सिजू (वय १८ वर्षे), कोची (१४.५.२०२०)