‘काही वर्षांपूर्वी मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ‘तेथील देवतांच्या चित्रांच्या डाव्या बाजूला श्री गुरुनानक देव आशीर्वादाच्या मुद्रेत बसले आहेत’, असे मला दिसले. यापूर्वी आणि यानंतरही मला अशा प्रकारे श्री गुरुनानक देवांचे दर्शन झाले नव्हते. ध्यानमंदिरात त्यांचे दर्शन झाल्यामुळे ‘गुरुतत्त्व एकच असते’, असा संदेश ते देत आहेत’, असे मला जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आणि साक्षात् वैकुंठ लोकातील ध्यानमंदिरात मला ही अनुभूती आली. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– सौ. संदीप कौर, फरिदाबाद, हरियाणा. (१२.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |