स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपयांचे साहाय्य करावे ! –  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप  त्याची आई आणि बहीण यांनी केला आहे. स्वप्नीलची मुलाखत घेण्यासाठी सरकारला दीड वर्षे वेळ मिळाला नाही, ही गंभीर गोष्ट आहे.

सोलापूर येथे मराठा आक्रोश मोर्चा प्रकरणी ४६ आंदोलकांवर गुन्हा नोंद

पोलिसांची अनुमती नसतांना आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांसह सहभागी ४६ आंदोलकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

‘एम्.पी.एस्.सी.’च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

विरोधकांनी उपस्थित केलेल्या सूत्रावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एम्.पी.एस्.सी.’ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.

‘अनिल देशमुख असेच मधे बोलत असल्याने ते ‘आत’ जात आहेत !’

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाला सत्ताधार्‍यांचा आक्षेप, सत्ताधारी आमदार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी !

चंद्रकांत पाटील यांच्याकडून ५२ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी

साखर कारखान्यांच्या विक्रीतील अपहाराचे प्रकरण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे ५२ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याविषयीचा ठराव विधानसभा आणि विधान परिषद येथे संमत !

मराठा समाजाला ‘एस्.ई.बी.सी.’तून आरक्षण देण्याविषयीचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यघटनेत यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याविषयीचा ठराव विधानसभा आणि विधान परिषद येथे संमत केला आहे.

सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर होण्यासाठी ‘महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) विधेयक २०२१’ संमत !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ‘महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) विधेयक’ विधानसभा आणि विधान परिषदेत संमत करण्यात आले. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हे विधेयक मांडले.

‘पंढरपूर वारीसाठी मी माघार घेत आहे’, असे सांगण्यासाठी पोलीस प्रशासनाचा माझ्यावर दबाव होता ! – संतवीर बंडातात्या कराडकर

मी देवपूजा केल्याविना पाणीही पित नाही. हे वारंवार पोलिसांना सांगूनही त्यांनी मला देवपूजा करू दिली नाही. माझ्या जागी उच्च रक्तदाब आणि साखर यांचा रुग्ण असता, तर तो निश्चित दगावला असता.

कॅनडा आणि ‘ख्रिस्ती’ कुकर्म !

जगभर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हे बिनबोभाटपणे चालू असतांना जगातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे झोपा काढत होते !

राष्ट्र-धर्माभिमुख साहित्य हवे !

साहित्याच्या माध्यमातून विद्रोही आणि राष्ट्र-धर्मविरोधी विचार रुजवणे, हे ‘स्लो पॉयझन’प्रमाणे आहे. यामुळे नव्या पिढीची दिशाभूल होते.