नागपूर येथील मेडिकल आणि मेयो शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी ‘कामबंद’ आंदोलन !

आरोग्य व्यवस्थेचा ताण वाढणार !

नागपूर येथील कोरोनासंबंधी आर्थिक व्यवहारांच्या धारिका ‘सीलबंद’ करून ठेवण्याचा महापौरांचा आदेश !

कोरोनाच्या काळात औषधांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी केला आहे.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचा विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय !

विद्यार्थ्यांकडून शुल्काची आकारणी न करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ !

बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोचले असता या वेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांमध्ये झटापट झाली, तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला.

खारघर येथील बोगस आधुनिक वैद्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी !

खारघर भागातील सेक्टर १५ येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील रोहित गुप्तेश्वर यादव (वय २७ वर्षे) या बनावट आधुनिक वैद्याला पनवेल महानगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे.

महापालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र १ सहस्र खाटांचे रुग्णालय उभारावे ! – शिवसेनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका ७५ लाख रुपये व्यय करून ‘ऑक्सिजन प्लान्ट’ उभारत आहे. यातून १२५ ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे; मात्र तिसर्‍या लाटेचे गांभीर्य ओळखून ५०० सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत.

असे व्हायला कानपूर पाकमध्ये आहे का ?

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्यांक हिंदू बहुसंख्य मुसलमानांच्या दहशतीमुळे घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हिंदूंनी त्यांच्या घराबाहेर ‘घर विकणे आहे’, असे फलक लावले आहेत.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील साधकांसाठी ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ पार पडले !

मिरज (जिल्हा सांगली) – सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील साधकांसाठी ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ नुकतेच घेण्यात आले.