अनेक वर्षांनी जागी झालेली सरकारी यंत्रणा ‘ईडी’ !

​‘आयकर विभागाने जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची (‘पी.एफ्.आय.’ची) ‘८० जी’ ही नोंदणी रहित केली आहे. कलम १२ अ (३) अंतर्गत एखादी संस्था किंवा न्यास कार्य करत नसेल, तर त्यांची नोंदणी रहित करता येऊ शकते. ‘पी.एफ्.आय.’वर गेल्या वर्षी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाला अर्थपुरवठा केल्याचा आरोप आहे. पी.एफ्.आय.ने केरळमध्ये आतंकवादी केंद्रे स्थापन करण्यासाठी पैसे गोळा केले आहेत. पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांच्या पडताळणीनंतर ही गोष्ट समोर आली आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) विशेष न्यायालयात सांगितले.