हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करून घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

नागपूर येथे कोरोनापेक्षा ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण दुप्पट वाढल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम !

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झाला असला, तरी ‘म्युकरमायकोसिस’ने (काळी बुरशी) या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाचे २१० अत्यवस्थ रुग्ण भरती झाले आहेत..

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत केली सामूहिक योगासने !

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जून या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत सामूहिक योगासने केली.

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळेच आपल्यापैकी लाखो लोकांना कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी साहाय्य झाले. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग हा अविभाज्य भाग बनवला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून केले

‘गोमेकॉ’तील ‘ऑक्सिजन’चा तुटवडा तपासण्यासाठी न्यायिक अन्वेषणाला गोवा शासनाचा नकार

असे असेल, तर प्रशासनाने सुव्यवस्थापन करून कोरोना रुग्णांच्या उपचारांतील अडचणी दूर कराव्या, असेच जनतेला वाटते !

नागपूर येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या !

शहरातील पाचपावली भागात रहाणारे कुटुंबप्रमुख आलोक माथुरकर याने प्रथम पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर रहाणारे सासू आणि मेहुणी यांचीही हत्या केली.

गडचिरोली येथे गायींची तस्करी करणार्‍या टोळीतील ९ जणांना अटक !

जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे ३० गायींची तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणार्‍या ३ वाहनांच्या टोळीतील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

सरकारी व्यवस्थेतील सचिव मंदिरातील नंदीप्रमाणे असून तेच सरकार चालवतात ! – नितीन गडकरी यांची नोकरशाहीवर टीका

‘सरकारी व्यवस्थेतील सचिवांची स्थिती मंदिरातील नंदीप्रमाणे आहे. मंदिरातील नंदीला जितके महत्त्व असते, तितकेच यंत्रणेतील सचिव महत्त्वपूर्ण झालेले आहेत. हेच लोक सरकार चालवतात’, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीवर केली.

बाटलेल्या हिंदूंची घरवापसी करा !

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !

कोरोना संपेपर्यंत सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

कोरोना संपेपर्यंत मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मुंबईतील लोकल रेल्वे कधीपासून चालू होणार ? याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले.