गडचिरोली येथे गायींची तस्करी करणार्‍या टोळीतील ९ जणांना अटक !

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

गडचिरोली – जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे ३० गायींची तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणार्‍या ३ वाहनांच्या टोळीतील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाहनांतील ३० गोवंशियांना गोंडपिपरी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. ३ वाहने आणि गायी असा एकूण ३० लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. अनेक दिवसांपासून छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रमार्गे तेलंगणा राज्यात गायींची तस्करी चालू आहे. पोलिसांनी पाठलाग करून गायींची वाहतूक करणारी वाहने पकडली.