
नागपूर – शहरातील पाचपावली भागात रहाणारे कुटुंबप्रमुख आलोक माथुरकर याने प्रथम पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर रहाणारे सासू आणि मेहुणी यांचीही हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या घरी येऊन आत्महत्या केली. ही घटना २० जून या दिवशी घडली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !