आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत केली सामूहिक योगासने !

अधिकारी आणि कर्मचारी यांसमवेत योगासने करतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जून या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत सामूहिक योगासने केली. सांताक्रूझ येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेच्या प्रशिक्षकांनी हा वर्ग घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित अंतर राखून वर्ग घेण्यात आला.