विशाळगडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवा !

विशाळगडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, तसेच नरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे अन् गडावरील मंदिरे यांचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी केली आहे.

राज्यातील ७१ सहस्र रिक्शाचालकांना आर्थिक साहाय्य ! – अनिल परब, परिवहनमंत्री

आर्थिक साहाय्यासाठी अद्याप २ लाख ६५ सहस्र ४६५ रिक्शाचालकांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज केले आहेत. कोरोनाच्या निर्बंध काळात रिक्शाचालकांना १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

गोव्यातील संचारबंदीत २१ जूनपर्यंत वाढ

राज्यशासनाने संचारबंदीत २१ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १२ जून या दिवशी रात्री उशिरा ट्वीट करून याविषयी माहिती दिली.

सरकारने पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पालट करून पायी वारी होण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या १६ जून या दिवशी सोलापूर येथे भजन आंदोलन करणार आहोत….

औषधांचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याविषयी केंद्र सरकारने खुलासा करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

राज्यात म्युकरमायकोसिसमुळेे दोन दिवसांत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘औषध वितरणात केंद्र सरकार हात आखडता घेत आहे’, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत ! – आकाश फुंडकर, आमदार, भाजप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात १० जून या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. ‘नियोजन भवन केवळ शासकीय बैठकांसाठी सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे कुठलेही राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत

दंड थकवणार्‍यांच्या घरी जाऊन पोलीस दंड वसूल करणार !

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दंड आकारूनही ते तो भरत नसल्याने आता पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन दंड वसूल करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचा दंड थकला असून तो वसूल करण्याची मोहीम १४ जूनपासून हाती घेण्यात येणार आहे.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकारांचे धडे !

विद्यापिठाने ‘ऑनलाईन’ परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘यू ट्यूब आणि इतर सामाजिक माध्यमे’ यांच्यावर ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकार कसे करायचे ?’ याचे धडे देणार्‍या अनेक ध्वनीचित्रचकत्या आहेत.

म्युकरमायकोसिसची तीव्रता वाढलेल्या ३० टक्के रुग्णांवर उपचार अशक्य !

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनच्या मात्राही पूर्ण आणि वेळेत मिळत नसल्याने ही बुरशी नियंत्रणात आणणे अवघड होते.

गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील २५० दुर्गप्रेमींशी संवाद !

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडचणींचा पाढा वाचत होतो; पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ?….