नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत ! – आकाश फुंडकर, आमदार, भाजप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेचे ठिकाण वादाच्या भोवर्‍यात !

बुलढाणा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात १० जून या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. ‘नियोजन भवन केवळ शासकीय बैठकांसाठी सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे कुठलेही राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत; मात्र सत्तेचा दुरुपयोग करून नाना पटोले यांनी तेथे पत्रकार परिषद घेतली’, असा आरोप येथील भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी ११ जून या दिवशी केला.