औषधांचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याविषयी केंद्र सरकारने खुलासा करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सातत्याने म्युकरमायकोसिसवरील औषधांची मागणी करूनही त्यांचा महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा का केला जात नाही ? याविषयी केंद्र सरकारने खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्यात म्युकरमायकोसिसमुळेे दोन दिवसांत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘औषध वितरणात केंद्र सरकार हात आखडता घेत आहे’, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. औषध साठा अपुरा पडण्याची नेमकी कारणे काय आहेत, याचा खुलासा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.