नागपूर – जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ची रुग्णसंख्या १ सहस्र १२२ हून अधिक झाली आहे. याचसमवेत ‘म्युकरमायकोसिस’मुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ६४ रुग्णालयांसह मेयो मेडिकल आणि ग्रामीण भाग येथेही मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद आहे. वर्धा येथे सर्वाधिक ८१ रुग्ण मिळाले आहेत. ‘म्युकरमायकोसिस’ आजार एकदा झाल्यानंतर त्यावर शस्त्रकर्म करण्याविना पर्याय नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे.