राज्यात विविध ठिकाणी चक्रीवादळाचा फटका, ११ जणांचा मृत्यू !

वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता. राज्यातील सहस्रावधी बांधकामांची पडझड ! जहाजात अडकलेल्या १३७ प्रवाशांना सुरक्षित हालवले ! ‘मुंबई हाय’जवळ ओ.एन्.जी.सी. कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; ९६ जण बेपत्ता !

बेळगाव येथील प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !

गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.

कोवळ्या मनांच्या धर्मांतराचा घाट !

संस्कारक्षम वयात हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतराचे आघात होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आजमितीला अशा किती मुलांचे धर्मांतर झाले असेल ? याची गणतीच नाही. विविध आमिषे दाखवून हिंदु मुलांना चर्चमध्ये बोलावले जाते. येथून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे चालू होते. ‘स्लो पॉयझन’प्रमाणे ….

विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘येत्या काळात अनेक वैश्‍विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात महाराष्ट्रात ११ जणांचा मृत्यू, तर १२ सहस्र घरांची हानी ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री

‘राज्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, तर १२ सहस्र घरांची हानी झाली आहे. आतापर्यंत १५ सहस्र लोकांना सुरक्षित जागेवर हालवले आहे

चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील संरक्षक कठडा कोसळला !

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८ मे या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे. याविषयी माहिती मिळताच मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

स्वार्थीपणाचा कहर !

एकेकाळी महासत्ता असणार्‍या सुसंस्कृत भारतामध्ये आणि स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाल्यानंतर अशी प्रजा भारतामध्ये निर्माण होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे; कारण जो समाज स्वार्थी असतो, तो देशाच्या प्रगतीचा विचार कधीच करू शकत नाही.

माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला, तर देशात आपोआप कोरोना नियंत्रणात येणार आहे. तुमच्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणार्‍या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा.

कोकणातील उद्ध्वस्त शेतकर्‍यांना बांधावर जाऊन तातडीने साहाय्य करावे !

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्यशासनाकडे मागणी. लागोपाठ दुसर्‍या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची पुष्कळ हानी झाली आहे.