बेळगाव येथील प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !

प.पू. डॉ. गिंडे महाराज (उजवीकडे) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचा भावस्पर्शी क्षण ! (वर्ष २०१५)
  • प.पू. (डॉ.) वा.पु. गिंडे यांची सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्याप्रती विशेष श्रद्धा होती आणि त्यांचे काही काळ सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात वास्तव्यही होते.
  • प.पू. (डॉ.) वा.पु. गिंडे हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने होणार्‍या उपक्रमांना बहुतांश वेळा आपुलकीने उपस्थित असायचे.
  • गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.
  • संस्था आणि समिती यांच्या अनेक उपक्रमांना त्यांचे आशीर्वाद कायम असायचे.
  • गुरुपौर्णिमा, तसेच अन्य उपक्रमांमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ते हिंदु धर्मजागृती सभांना उपस्थित असायचे.
  • प.पू. (डॉ.) वा.पु. गिंडे हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक होते, तसेच ते सनातन संस्थेच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची नेहमी आपुलकीने चौकशी करायचे.

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांना मिळालेला सन्मान !

संत साहित्यातील योगदानाविषयी त्यांना श्रीमद् कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र स्वामीजी यांच्या वतीने गौरवपत्र देण्यात आले होते. पुणे विद्यापिठाचा ज्ञानदेव अध्यासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांना लाभला होता. महाराष्ट्र साहित्य परिषद, गीता धर्म मंडळ पुणे, पार्वती प्रतिष्ठान, नाशिक अशा अनेक संस्थांच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य ७३ व्या संमेलनात ‘ज्येष्ठ साहित्यिक’ म्हणून सत्कार करण्यात आला होता. सारस्वत समाजाचे स्वामी शिवानंद सरस्वतीजी कवळेमठ यांच्या हस्ते ‘संत साहित्याचे उपासक’ म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांनी केलेले अन्य कार्य

अ. ज्ञानेश्‍वरी, संत वाङ्मय आणि मराठी नाटक यांवर अनेक व्याख्याने, तसेच सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या आकाशवाणींवर व्याख्याने अन् अनेक चर्चासत्रांत सहभाग घेतला आणि निबंधवाचन

आ. अनेक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, पारमार्थिक आणि सांस्कृतिक संस्था यांना सहकार्य अन् सहभाग

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातन आश्रम म्हणजे आपला संपत आलेला चैतन्याचा विद्युतघट (बॅटरी) भारित (चार्ज) करण्याचे तीर्थस्थळ !

एका विदेशी साधकाने मला विचारले, ‘‘तुम्ही इथे कशासाठी आलात ?’’ मी एवढेच म्हणालो, ‘‘हा आश्रम आपला संपत आलेला चैतन्याचा विद्युतघट (बॅटरी) भारित (चार्ज) करून देतो. चैतन्याचा विद्युतघट भारित करण्याचे हे तीर्थस्थळ आहे.’’ याचकरता कदाचित आपल्या देशातील आणि विदेशातील साधक, १७ – १८ वर्षांची मुले-मुली आपले घर दार सोडून आपल्या आश्रमात येतांना दिसतात. आजच्या चंगळवादी वातावरणात या तरुण वयाच्या मुलामुलींना येथे येऊन सेवा करावी, असे वाटते, हेही कौतुकास्पद आहे. येथे आलेला प्रत्येक साधक आणि साधिका आपल्याला नेमून दिलेली सेवा अत्यंत नियोजनपूर्वक, सेवाभावाने आणि निष्ठेने करतात. जवळजवळ ३५० साधक-साधिका परस्पर प्रेमभावनेने राहून सहकार्याच्या भावनेने आल्या-गेेल्यांची सेवा करतात. मुखावर प्रसन्न भाव ठेवून न कंटाळता आपापली सेवा करणारी ही मंडळी हेही आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे विचारधन !

माणसाने साधक म्हणून रहावे, चारित्र्य शुद्ध ठेवावे आणि शक्य झाल्यास देह ठेवतांना सिद्ध म्हणून, संत म्हणून ठेवावा !

‘माणसाने आयुष्यभर साधक म्हणून रहावे, चारित्र्य शुद्ध ठेवावे आणि शक्य झाले तर देह ठेवतांना सिद्ध म्हणून, संत म्हणून ठेवावा. हे कठीण आहे; पण यासाठी सातत्याने अंतर्मुख होऊन ‘मी कोण आहे, साधनेच्या नेमक्या कोणत्या पायरीवर आहे आणि मला कुठपर्यंत पोचायचे आहे’, असा विवेक मनात जागता ठेवला पाहिजे. साधनेचा आरंभ कोऽहं पासून व्हावा, मध्ये येणारा अहंभाव ओलांंडून सोऽहं साधनेपर्यंत जाऊन पोचावे, यातच जीवनाची कृतार्थता आहे. ‘स्टेट ऑफ डुइंग, देन स्टेट ऑफ नोईंग अ‍ॅन्ड स्टेट ऑफ बिईंग’, म्हणजेच साधना करत रहावी, त्यासाठी सतत शिकत रहावे आणि शेवटपर्यत साधक म्हणूनच जगावे, म्हणजे ‘सहजावस्था’ होय.’